IOT: Internet Of Things

इंटरनेटमुळे जग जवळ आलं असं आपण नेहमीच म्हणतो , Networking, Facebook , Whatsapp , E-mails या गोष्टी आता रोजच्या जीवनात समाविष्ट झाल्या आहेतच; परंतु त्याही पलीकडे जाऊन इंटरनेट आपल्यासाठी किती तरी गोष्टी करू शकतं हे IoT मुळे लवकरच आपल्या लक्ष्यात येईल.

पुढील काही दशकांत अनेक गोष्टीचं IoTization झालेलं असेल आणि आतापेक्षा कितीतरी वेगळं आणि smart जग आपल्याला अनुभवायला मिळेल ह्यात शंकाच नाही. कारण सध्या IoT हा सर्वच स्तरांवर संशोधनाचा विषय झालाय. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत IOT बद्दल. Continue reading

Advertisements

Li-fi technology…better than wi-fi

Friends, येत्या काही वर्षातच आपल्या घरातील LED बल्ब चा वापर तुम्ही इंटरनेट वापरासाठी करू शकणार आहात अशी कल्पना केली होती का?  ………… Lifi technology मुळे हे शक्य आहे. कसं ते बघूया……..

खर तर वाय -फाय technology आता आपल्या सर्वांच्याच परिचयाची  झालेली आहे कारण तीचा वापर प्रचंड वाढला आहे. अगदी इलेक्ट्रिसिटी प्रमाणे प्रत्येक घरात wi-fi router देखील असतोच असतो.

Wireless communication म्हणजेच आपला जो काही डेटा किंवा information असते ती एखाद्या वायर शिवाय आपल्यापर्यंत ….आपल्या कुठल्याही device मध्ये (उदाहरणार्थ laptop, desktop, mobile tablet ) मध्ये येऊन पोचते. आणि त्यासाठी लागणारा स्पीड सुद्धा उत्तम मिळत असल्याने wifi चा वापर आणि प्रसार वाढला.

काही बाबतीत मात्र आपल्याला तोटे बघायला मिळतात जसं की विमानात असताना आपल्याला ती frequency मिळू शकत नाही, मोठमोठे केमिकल प्लांट्स जिथे या radio frequncies हानिकारक ठरू शकतात, त्याचप्रमाणे बोगदा किंवा खाणीत जिथे ह्या frequncies पोचू शकत नाहीत तिथे आपल्याला data transfer शक्य होत नाही.

हे सर्व जरी असलं तरी अनेक रिसर्चर्सनी या रेडीओ frequencies मानवी जीवनास कायमच हानिकारक आहेत असंच वेळोवेळी सिद्ध केलंय. परंतु इंटरनेट साठी असलेली आपली मागणी काही कमी होत नाही.

Continue reading

Nokia is back …..with android :)

एक वेळ पाषाणाचे तुकडे होतील पण नोकियाचा फोन तुटणार नाही अशी एकेकाळी जबरदस्त ओळख असणाऱ्या  नोकिया च्या प्रगतीला android मुळे ग्रहण लागलं असं अनेकदा म्हटलं जातं ; हळूहळू नोकिया चे फोन लोकांकडे दिसणं तर  कमी झालंच पण  आता नोकिया कंपनी बंद होण्याच्या वाटेवर आहे वगैरे वगैरे बातम्या येऊ लागल्या. पण असं इतक्या सहज सहजी होऊ शकतं का हो ? Continue reading

आपली मुंबई मोनोरेल

लहानपणीचं गाणं “झुकझुक झुकझुक अगीनगाडी” अजूनही आठवत असेल नं? अहो आपलंच नाही तर आताच्या पिढीचंही लहानपण हे गाणं ऐकण्यात चाललंय, त्याची अवीट गोडी अजूनही सरलेली नाहीये.

पण मंडळी, झुकझुक करणारी गाडी गाण्यात अजूनही आपण ऐकत असलो तरीही धुरांच्या रेषा हवेत सोडणारी गाडी मात्र आता कालबाह्य झालीये हे खरं! मला तर कधी बघायला मिळाली अशी गाडी तर अनेक वर्ष मागे गेल्याचं सुख अनुभवयला मिळेल.

शाळेत इतिहास वाचतांना इंग्रजांचा प्रचंड राग यायचा. पण मुळात रेल्वे आपल्याकडे आली ती या इंग्रजांमुळे ते कळल्यावर थोडा  राग कमी होतो. खरतर त्यांनीसुद्ध्या सुरु केली ती स्वतःच्या  स्वार्थासाठीच ! म्हणजे तेव्हा जास्त पर्याय नव्हते वाहतूकीचे ; मग साहेबांना आपल्या कडचा कापूस ने-आण करण  सोपं  जावं  म्हणून. तसं आपणही सुरु करू शकलो असतो परंतु किती वर्ष गेली असती त्याचा काही नेम नाही. so निदान त्या कारणासाठी तरी साहेबाला धन्यवाद म्हटलं पाहिजे.

Continue reading

क्रिकेट आणि Technology

क्रिकेट! क्रिकेट! क्रिकेट ! कुणालाही आवडता असा हा खेळ! म्हणूनच आजची post क्रिकेटमधील Technology बद्दल…..

माझं लहानपण डोंबिवलीसारख्या गजबजलेल्या शहरात गेलं जिथे आम्हाला खेळायला गच्चीशिवाय काही पर्याय नव्हता. मैदान वगैरे तर मी शाळेच्या ग्राउंड व्यतिरिक्त काही वेगळं मानलंच नाही. फक्त हे बरं होतं की आमची गच्ची खूप मोठी होती व खेळायला भरपूर मुलं होती. मुलं व तितक्याच मुली त्यामुळे आम्हा मुलींना आवडणारे खांबखांब , लपाछपी, सोनसाखळी, विषाम्रुत हे खेळ जितके खेळले जायचे तितकंच मुलांना आवडतं म्हणून क्रिकेटही भरपूर खेळायचो. जेवढी भांडणं, आरडाओरडा क्रिकेट खेळतांना व्हायचा तितका कुठल्याच खेळात झाला नसेल. हां पण मजाही तितकीच यायची हे खरंय.

गच्ची पाचव्या मजल्यावर त्यामुळे आमचे नियमही आमच्या हिशोबाने बनवलेले…. ….बॅटींग फार जोशात करणं चालायचं नाही कारण बाॅल बिल्डीगबाहेर गेला की तो आउट धरला जायचा, ज्याने बाॅल बाहेर घालवला त्यानेच तो खाली जाउन आणायचा; त्यामुळे ५जिने उतरून पुन्हा तितकंच चढून यायला फार कंटाळा यायचा. मी तर ह्या भितीमुळे फार बेतानंच खेळायचे किंवा मग माझी बॅटींग शक्य तेवढी पुढे ढकलायचे. ह्यात गंमत अशी आहे की ज्या टिमची बाॅलिंग असेल ते मुद्दाम फास्ट बाॅल टाकत त्यामुळे बऱ्याचदा बॅटींग करणारा ४ किंवा  ६ मारायच्या नादात बाॅलला सरळ बिल्डीगबाहेरचा रस्ता दाखवायचा व आपोआप आउट व्हायचा.

Continue reading

एका चहाची गोष्ट

काल आंतरराष्ट्रीय चहा दिन होता. आंतरराष्ट्रीय महत्व यासाठी की अगदी जगभर लोक चहा घेतात. कॉफी पेक्षा सुद्धा चहाचे चाहते ….किंवा “चहाते ” जास्त असावेत त्यामुळे चहा दिन वगैरे साजरा होतोय. .

काही ‘चहा’त्यांना तर कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी चहा दिलेला चालतो, “जेवण झालंय आत्ता नको” किंवा “खूप ऍसिडिटी झालीये आत्ता नको”, “अत्ताच गोड जेवलोय” वगैरे बोलून ते चहा नाकारत नाहीत आणि स्वतःला अट्टल ‘चहा’बाज किंवा चहेनाशहा वगैरे म्हणून घेताना दिसतात.

मी अगदीच ह्या category मध्ये नसली तरी ‘चहाती’ नक्कीच आहे.

घड्याळात वाजले सहा, आईने केला चहा | चहा घेण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला |

ह्या कवितेच्या ओळी काल आठवल्या , त्या बालवयात जो काही चहाने आयुष्यात प्रवेश केलाय तो आजपर्यंत.माझ्या दिवसाची तर सुरुवातच नाही होणार चहा नसेल तर. बाहेरगावी जरी गेले तरी हॉटेल मध्ये उतरल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा कधी मिळेल ही  चौकशी पहिल्यांदा  करते …तिथलं  site सीइंग वगैरे सर्व नंतर. Continue reading

e-Waste Management

India, which has emerged as the world’s second largest mobile market, is also the fifth largest producer of e-waste, a study says” this line from The Hindu … made me worried for a while.

I really like to read and write about technology, researches and revolutions in these fields but i think we should also consider the downside of this technology.

I decided to write my new post on the topic e-Waste Management , as many people still are not aware about e-waste management and its importance.

I read many ways by which different countries dispose their e-waste and how their e-waste collection centers works i was about to design my article but coincidentally i got to discuss about e-waste management at my own home few days back

Conversation at my home with my husband (Deepak) and daughter (Durva) goes like this…..

Continue reading